अवैध दारु धंद्याला कंटाळलेल्या संतप्त महिला व युवकांचा चाप.; हुमगाव येथील दारूचे बॉक्स फोडून दिले पेटवून.. 

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  जावळी तालुक्यातील हुमगाव गेल्या पंधरा दिवसांपासून पाचवड पाचगणी मार्गावर मुख्य चौकातच एकाने बेकायदेशीर दारुचा अड्डा सुरु केला होता.ग्रामस्थानी त्याला वारंवार समज देऊनही त्याने राजरोस पणे हा धंदा सुरूच ठेवला होता.अखेर या धंद्याला कंटाळून गावातील महिला व युवकांनी एकत्र येत सर्वच अड्डय़ावर धाड टाकून त्याचे दारूचे बॉक्स फोडून दिले पेटवून. त्यामुळे दारू धंदे वाल्यांची चांगलीच तंतरली आहे..

हुंमगाव येथे अवैध दारू धंद्यावर महिलांची धडक अवैध्य दारू बॉक्स दिले पेटवून

एकूण तीन पैकी दोन विक्रेते पसार झाले तर एकजण महिलांच्या तावडीत सापडला. महिलांनी त्याच्याकडील दारुचे बाॅक्स रस्त्यावर आणून फोडले व पेटवून दिले.यावेळेस संबंधितास महिलांकडून धक्काबुक्कीही करण्यात आली.

जावळी तालुका हा दारुदुकान मुक्त तालुका आहे.पण त्यामुळेच अवैध धंद्याना तालुक्यात ऊत आला आहे.तालुक्यात जवळपास 45 ठिकाणी अवैध दारू विक्री केली जाते.पोलीस कारवाई करतात मात्र या कारवाईत केवळ त्याचे पंटरच सापडतात. मुख्य आका या कारवाई च्या जाळ्यात आजपर्यंत कधीच अडकला नाही.

त्यामुळेच या धंद्याना पोलीसाचे पाठबळ आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.या परिसरात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, बॅक,आरोग्य उपकेंद्र तसेच अनेक गावातील प्रवासी याठिकाणी एस टी साठी थांबतात. गेल्या पंधरा दिवसांपासून याठिकाणी मद्यपीची वर्दळ वाढली होती.त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक व महिलांना होत होता.त्यामुळेच महिलानी आज आक्रमक पवित्रा घेत हे दोन्ही अड्डे उद्ध्वस्त केले.एकजण यातून पळून जाण्यात यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!