वाई फेस्टिवल निमित्त उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था आयोजित रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : वाई फेस्टिव्हलचे औचित्य साधित उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था पाचगणी व बालाजी ब्लड बँक सातारा त्यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्याने राबविलेल्या ऑपरेशन सिन्दुरचा अभिमान उराशी बाळगून हे रक्तदान शिबिर संपन्न झाले यामध्ये ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पाचगणी, तालुका महाबळेश्वर येथील श्रीराम चौकातील उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था पाचगणी यांनी बालाजी ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यावेळी रक्तदात्यांना ५ लिटरचा कुकर भेट देण्यात आले.
या रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थितिमध्ये – महेश खांडके,नामदेव चोपडे, आशा वन्ने, मॅडम, कुलकर्णी मॅडम, बिरामने मॅडम, श्रीकांत शिंदे (संचालक), साल्वेकर सर, प्रकाश पवार ( मुख्य व्यवस्थापक), प्रशांत सोनावने आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन -जितेंद्र मांढरे,महादेव भगत,मितेश मोरे,प्रमोद कदम,अक्षय सोनावने,रविराज देखणे व अमित कळंबे यांनी करून सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली आहे. तर
कृष्णाई क्रीडा मंडळाचे विशेष सहकार्य लाभले .

