पाचगणी नगरपालिकेच्या राजकीय रणधुमाळीत आत्तापर्यंत ७० अर्ज दाखल ; नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदाकरीता ६२ अर्ज दाखल….!!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून पहिले तीन दिवस शून्य फिगरवर राहिलेला अर्ज दाखल तक्त्याने चौथ्या दिवशी ओपनिंग करीत ,९ खाते खोलले, पाचव्या दिवशी २७ अर्ज दाखल झाले तर आज सहाव्या दिवशी हा आकडा वाढत जाऊन ३४ अर्ज दाखल अर्ज दाखल झाले. असून आत्तापर्यंत ७० अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ८ तर ६२ अर्ज मागासेवकसाठी भरले गेले आहेत. अजून दोन शिल्लक असल्याने अर्ज दाखल करण्याकरिता मोठी झुंबड उडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

आज दाखल झालेल्या ३४ अर्जामध्ये ३२ अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले असून दोन अर्ज अर्ज दाखल झाले आहेत ते पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र. १ – ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून किरण जानकर, व वैभव कन्हाडकर, प्रभाग क्र. २ – ‘अ’ अनुसूचित जाती महिला मधून सुप्रिया माने, रेणुका कांबळे, ‘ब’ सर्वसाधारण मध्ये नरेंद्र. बिरामणे, हरिश गोळे , प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ सर्वसाधारण (महिला) मधून आरती साळुंखे, प्रभाग क्र. ४ -‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) मधून परवीन मेमन, ‘ब’ सर्वसाधारण मध्ये शेखर कासुर्डे,
प्रभाग क्र. ५ – ‘अ’ ना. मा. प्र. (महिला), मधून रेखा जानकर,

प्रभाग क्र. ६ – ‘अ’ सर्वसाधारण (महिला) मधून साधना कासुर्डे, माधुरी कासुर्डे प्रतिक्षा कासुर्डे,
‘ब’ सर्वसाधारण मध्ये गणेश कासुर्डे,
प्रभाग क्र. ७ – ‘अ’ नागरिकांचा मागास प्र.(महिला) मधून लक्ष्मी कऱ्हाडकर, यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्र. ८ – ‘अ’ अनुसूचित जाती, अमित कांबळे, सुनिल खरात, किरण रणपिसे, रविराज देखणे ‘ब’ सर्वसाधारण (महिला) मधून अभिलाषा कऱ्हाडकर, प्रिती पिसाळ, प्रत्येकी एक अर्ज दाखल, प्रभाग क्र. ९ – ‘अ’ अनुसूचित जाती (महिला) मधून ,कांबळे स्वाती कांबळे, आशा वन्ने, सुषमा मोरे, दोन अर्ज दाखल, ‘ब’ सर्वसाधारण मधून दिलिप टेके, हेन्री जोसेफ, प्रकाश गोळे, प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्र. १० – ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून नामदेव चोपडे, योगेश जानकर ‘ ब ‘- सर्वसाधारण (महिला) अमृता गोळे, दोन अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती नगराध्यक्ष पदासाठी, सुनिल कांबळे, दिलीप बगाडे, प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.
अद्यापि रविवार आणि सोमवार अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी दाखल होणाऱ्या अर्जावरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल..

