प्रतिष्ठेच्या खर्शी – बारामुरे गणातून समीर गोळे यांचा शड्डू ; निवडणुकपूर्व तयारीला वेग..

Spread the love

तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पंचायत समितीच्या निवडणुका होत असून गण आरक्षण सोडती जाहीर झाल्या आहेत. जावळी तालुक्यातील मातब्बर दिग्गजांना पंचायत समितीच्या सभापती खुर्चीत बसविणारा प्रतिष्ठेचा खर्शी – बारामूरे गण प्रख्यात आहे. यावेळी हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. या गणातून यावेळी शिंदे  शिवसेनाच्या  वतीने समीर गोळे यांनी शड्डू ठोकला आहे.

जावळी तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले असून खर्शी – बारामूरे गण सर्वसाधारण प्रवर्गाला जाहीर झाल्याने शिंदे शिवसेनेचे युवा तरुण जावळी तालुका प्रमुख समीर गोळे यांचे नाव पक्षातून पुढे येत आहे. या बाबत समीर गोळे यांच्याशी बोलणं केलं असता वरिष्ठांकडून तयारीचे संकेत प्राप्त झाल्याचे सांगितले.

शिवसेनेने यापूर्वी या गणातून निवडणूकी लढवून  जिंकल्या आहेत. तर याच गणाने पंचायत समितीचे प्रनिधित्व केलं आहे. यामुळे हा हक्काचा गण आपल्या ताब्यात रहावा याकरिता शिवसेना सरसावली आहे. समीर गोळे यांना येथून उतरवले जाईल त्या दृष्टीने तयारी चालू आहे. तालुका प्रमुख तसेच भागवली, तर्फ कुडाळ गावचे थेट सरपंच समीर गोळे हे निवडणूकपूर्व तयारीस लागले आहेत.

जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे तसेच उपजिल्हा प्रमुख संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी खर्शी – बारामूरे गणावर तसेच जावळी तालुक्यावर भगवा फडकविणल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.  तर महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्ष ठरवतील मात्र हा शिवसेना हा गण आपल्या पदरात पाडून घेण्यास उत्सुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!