भिलारमध्ये ११० कुणबी दाखल्यांचे वाटप; नागरिकांत समाधानाचे वातावरण

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार, तालुका महाबळेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात भिलार सह परिसरातील नागरिकांना कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात भिलारमधील १५ नागरिकांना, उंबरीतील १८ नागरिकांना, तर भोसे येथील ५ नागरिकांना कुणबी दाखले वितरीत करण्यात आले.

तालुक्यातील सर्वाधिक दाखले भिलार गावातच वाटप झाले असून आजपर्यंत येथे एकूण ११० कुणबी दाखल्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे भिलार हे कुणबी दाखल्यांच्या वाटपात अग्रस्थानी राहिले आहे.

भोसे येथील नागरिक रामचंद्र धोंडीबा गोळे यांना दाखला दिल्यानंतर त्यांनी शासन व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला ग्राम महसूल अधिकारी संजय पवार , ग्राम महसूल अधिकारी आर. व्ही. चव्हाण, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, पोलीस पाटील रूपाली कांबळे, तसेच  जावळी महाबळेश्वर समितीचे संचालक राजेंद्र भिलारे व भाजपा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल भिलारे (नाना) उपस्थित होते.

दाखला वितरणामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा तसेच नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!